महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरु!

1 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात तब्बल 394 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

गुरुवारी 16,104 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यातल्या बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 11 लाख 4 हजार 423 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.84 एवढे झाले आहे.राज्यात दिवसभरात 16 हजार476 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात तपासण्यात आलेल्या ६८,७५,४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,००,९२२ (२०.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २१,७४,६५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण २,५९,००६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

वाचा :- देश हादरला! डोकं चिरडून मुलीची हत्या; बलात्कार केल्याचा संशय