राजकारण

गांधींसोबतच्या धक्काबुक्कीनंतर पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पवारांनी ट्विटद्वारे व्यक्त केला संताप!

1 Oct :- हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी यमुना एक्सप्रेसवरुन पायी जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. यादरम्यान, राहुल गांधींना धक्काबूक्की करण्यात आली आणि यात त्यांच्या हाताला मुका मार लागल्याची माहिती आहे. या प्रकरावार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटद्वारे संताप व्यक्त केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले वर्तन निंदनीय आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.’ उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधींना ग्रेटर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या गावाकडे जाताना राहुल आणि प्रियंका यांची गाडी अडवण्यात आली, त्यानंर दोघे पायी हाथरसकडे जात असताना पोलिसांनी राहुल यांना ताब्यात घेतले.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल खाली पडले, पोलिसांनी राहुल यांच्या शर्चटी कॉलरदेखील पकडली. काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे की, राहुल यांच्या हाताला दुखापतही झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधींना ग्रेटर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा :- देश हादरला! डोकं चिरडून मुलीची हत्या; बलात्कार केल्याचा संशय

पीडितेच्या गावाकडे जाताना राहुल आणि प्रियंका यांची गाडी अडवण्यात आली, त्यानंर दोघे पायी हाथरसकडे जात असताना पोलिसांनी राहुल यांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल खाली पडले, पोलिसांनी राहुल यांच्या शर्चटी कॉलरदेखील पकडली. काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे की, राहुल यांच्या हाताला दुखापतही झाली आहे.

वाचा :- हाथरस घटनेनंतर राज ठाकरे संतापले!

वाचा :- आ. क्षीरसागरांनी अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी!