क्राईम

देश हादरला! डोकं चिरडून मुलीची हत्या; बलात्कार केल्याचा संशय

महिलां विरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं!

1 Oct :- एकीकडे कोरोना विषाणूचा कहार आणि दुसरीकडे देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराने देशातील जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांत महिलां विरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

हाथरस प्रकरणानंतर बलरामपुर, आजमगढ़ आणि बुलंदशहरमधील घटना समोर आल्या आहेत. आता भदोही मध्ये एका 14 वर्षीय मुलीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिचं डोकं चिरडून तिची हत्या केली. रक्ताळलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह शेतात सापडला.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कारानंतर तिची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पोलिसांकडून बलात्कारासह अन्य मुद्द्यांवरुन तपास करीत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांसह क्राइम ब्रांच व फॉरेन्सिक एक्सपर्ट या प्रकरणाचा तपास करीत आहे.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

14 वर्षीय मुलगी आज दुपारी शौचालयासाठी घराबाहेर पडली होती. काही वेळानंतर शेतात तिचा मृतदेह सापडला. रक्ताच्या थारोळ्यातला तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनाही धक्काच बसला. ज्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

वाचा :-  एसटी कामगार संघटना उद्या करणार गांधीगिरी

वाचा :- आ. क्षीरसागरांनी अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी!