राजकारण

हाथरस घटनेनंतर राज ठाकरे संतापले!

राज ठाकरेंचा सवाल, ओरडणारे आज गप्प का…?

1 Oct :- उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथे घडलेल्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिच्यावर केलेले अंत्यसंस्कार हा सगळा प्रकार हा मन विषण्ण करणारा आणि भीषण आहे. महाराष्ट्रात घडलेल्या एखाद्या घटनेवर अर्वाच्य पद्धतीने ओरडणारे आज गप्प का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.या प्रश्नावर उत्तर प्रदेश सरकारला जाब विचारला पाहिजे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटू दिलं नाही, त्यांना धक्काबुक्की केली जाते हे सगळेच अतिशय संताप आणणारे आहे. उत्तर प्रदेश सरकारला नेमकी कशाची भीती वाटते असा सवालही त्यांनी केला आहे. सर्वच माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर तुटून का पडत नाहीत असा सवालही त्यांनी केला.आज हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे.यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले.

वाचा :- रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’

हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात ‘ये देखो आज का हिंदुस्तान’ असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.

वाचा :- एसटी कामगार संघटना उद्या करणार गांधीगिरी

वाचा :- आ. क्षीरसागरांनी अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी!