महाराष्ट्र

गांधींना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेस आक्रमक

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं!

1 Oct :- हाथरस बलात्कार आणि हत्येतील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात योगी सरकार विरोधात आंदोलनं होणार आहेत.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

युवा काँग्रेस संध्याकाळी 6 वाजता आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, अस्लम शेख, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, झिशन सिद्दकी आणि काँग्रेस पदाधिकारी मंत्रालयाच्या बाजूला महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन करत आहेत.नाशिकमध्ये राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली या घटनेचा युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची उत्तर प्रदेश आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. तर पंढरपूर येथे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे काँग्रेसच्या वतीने अचानक रस्ता रोको करण्यात आला. काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी हे भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे रास्तारोको करण्यात आला आहे. त्या ठिकाणी असलेल्या बदोबस्त करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे.

वाचा :- रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’

या संदर्भासाठी औंढा येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने अचानक बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला. केंद्र शासन आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली आहे.

वाचा :- आ. क्षीरसागरांनी अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी!