बीड

आ. क्षीरसागरांनी अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी!

अजित पवारांनी दिले सकारात्मक आश्वासन!

1 Oct :- माझ्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रमाणे यूपीएससी व एमपीएससी च्या तयारीसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते,त्याच प्रमाणे नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील युवक बांधवांसाठी सारथी संस्थेतून शिष्यवृत्ती देण्यात यावी व इतर निधीची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मराठा समाजातील विविध प्रश्न कानी टाकले, यावर उपमुख्यमंत्री अजित दादा याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मराठा बांधवांनो भगिनींनो नको ते पाऊल उचलू नका,चुकीचा मार्ग निवडू नका आपण शिवरायांच्या विचारांनी जगणारे मावळे आहोत. आरक्षणासह समाजाचे प्रश्न सोबत मिळून सोडू व आरक्षणासाठी लढूया मी कायम आपल्या सोबत आहे,अशी भावनिक हाक आ. संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्यांने मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समजल्याने मन अतिशय व्यथित झाले अशी प्रतिक्रिया आ.संदीप भैय्या यांनी व्यक्त केली आहे.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

या विषयी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून यूपीएससी व एमपीएससी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी केली व रहाडे परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे आ. संदिप क्षीरसागर यांनी सांगितले. तालुक्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे हा नीटच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. यासाठी क्लासची फीस भरण्यासाठी त्याच्या पालकांनी व्याजाने पैसे घेतले होते. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आपला प्रवेश होणार नाही या तणावात त्याने नको ते पाऊल उचलले.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

या बाबत गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची वेळ घेतली व तातडीने त्यांची भेट घेऊन माझ्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रमाणे यूपीएससी व एमपीएससी च्या तयारीसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. त्याच प्रमाणे नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या बांधवांसाठी सारथी संस्थेतून शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे.

वाचा :- रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’

वाचा :- ‘या’ तारखेला येणार लक्ष्मी बॉम्ब