महाराष्ट्र

एसटी कामगार संघटना उद्या करणार गांधीगिरी

एसटी कामगार संघटना आक्रमक!

1 Oct :- कोरोनाच्या महामारीच्या काळात देखील एसटी कर्मचारी दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत आहेत.एसटी कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यांचं वेतन थकल्यानं या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकंटांना सामोरं जावं लागत आहे. तीन महिन्यांपासून वेतन नसल्यानं आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास संघटनांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या संदर्भात एसटीची एकमेव मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं या संदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केलंय की , कोविड – 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना त्यांना मात्र तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तर काहींनी उपासमारी होत असल्यानं टोकाचं पाऊल उचललं, असं या निवेदनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं नमूद केलं आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे वेतन न झाल्यास 9 ऑक्टोबरला एसटीच्या राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन मिळण्यासाठी इंटक संघटना देखील आक्रमक झाली आहे. संघटनेच्या एका निवेदनात नमूद करण्यात आलंय की, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन मुळातच अत्यंत कमी आहे, त्यात तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. परिणामी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

आर्थिक विवंचनेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल घेतल्याचं इंटकने देखील नमूद केलं आहे.वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अथवा 7 तारखेपूर्वी वेतन देणं बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात वेळेवर वेतन न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे.

वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका

7 ऑक्टोबर पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास इंटकच्या वतीनं उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं संघटनेनं पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, उद्या गांधी जयंती निमित्त इंटकच्या वतीनं प्रत्येक आगारात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.

वाचा :- रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’

वाचा :- ‘या’ तारखेला येणार लक्ष्मी बॉम्ब