राजकारण

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण!

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात होते सहभागी

1 Oct :- काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पटेल यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. पटेल यांनी ट्विटमध्ये संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी कोविड-19 पॉझिटिव्ह आलो आहे. माझी विनंती आहे की जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सेल्फ आयसोलेट व्हावं. काँग्रेस खासदार अहमद पटेल हे आताच झालेल्या पावसाची अधिवेशनात सहभागी झाले होते. यापूर्वी उपराष्ट्रपती एम वैकंय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

उपराष्ट्रपति सचिवालयाने मंगळवारी सांगितले की, नायडू यांना संसर्ग झाल्याची लक्षणं नाहीत आणि त्यांची तब्येत ठीक आहे. सचिवालयाने ट्विट केलं आहे. त्यानुसार भारताचे उपराष्ट्रपतींनी कोविड-19 चं नियमित परीक्षण केलं. ज्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका

नायडू यांना घरात आयसोलेट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, त्यांची पत्नी उषा नायडू यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. मात्र तरीही त्या आयसोलेट राहत आहेत.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

वाचा :- रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’