रिया चक्रवर्तीच्या घरात सापडलं दीड किलो ‘ड्रग’
रियाच्या अडचणीत वाढ!
1 Oct :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या घरी एनसीबीने छापा टाकला ज्यावेळी तब्बल दीड किलो ड्रग्ज सापडलं आहे. त्यामुळे आता दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
एनसीबीने रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडलं आहे, हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं.
वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!
ड्रग्ज घेतल्याने आणि त्याचा व्यवहार केल्याने रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. रिया आणि शोविकच्या जामीन याचिकेवर 29 सप्टेंबरला त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका
मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याबाबत कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरात ड्रग्ज सापडले आहे. एनसीबीला मोठा पुरावा सापडला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.