राजकारण

राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की!

1 Oct :- हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली.उत्तर प्रदेश पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत राहुल गांधी व त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना पुढे जाण्यापासून अडवले यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. त्यांनाही पुढे जाण्यापासून अडविण्यात आले.यावेळी पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व यामध्ये ते जमिनीवर कोसळले.यानंतर काँग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त केला.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीवरुन देशभरात राग व्यक्त केला जात आहे.राहुल गांधी यांनी मी एकटा पुढे जात असल्याचे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. मात्र कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा राहुल गांधींनी ठेवला होता.यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना अटक केली आहे.

वाचा :- अनलॉक 5 ची नियमावली जाहीर!

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला.

वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका

मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी ” ये देखो आज का हिंदुस्तान,” असं राहुल गांधी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.

वाचा :- ‘या’ तारखेला येणार लक्ष्मी बॉम्ब