सिनेमा,मनोरंजन

‘या’ तारखेला येणार लक्ष्मी बॉम्ब

भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये होणार प्रदर्शित

30 Sept :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सिनेमागृह बंद असल्या कारणाने अनेक बिग बजेट चित्रपट प्रतीक्षेत आहेत.अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक विशेष प्रतीक्षेत असतात. मात्र कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्याने चित्रपटगृह बंद राहिली आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच लांबली.परंतुअक्षय कुमारच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण अक्कीचा मोस्ट अवेटेड सिनेमा लक्ष्मी बॉम्ब लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 नोव्हेंबरला हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे.कोरोना, आर्थिक मंदी आणि अनेक महिने सिनेमागृह बंद असल्यामुळे लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. पण आता 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कॉमेडी हॉरर असा या चित्रपटाचा जॉनर आहे.

वाचा :- अनलॉक 5 ची नियमावली जाहीर!

सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलिज झालं तेव्हापासूनच अक्षयच्या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली होती. राघवा लॉबॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचं मोशन पोस्टर झळकलं होतं. आणि हे मोशन पोस्टर आत्तापर्यंत सर्वात जास्त पाहिलं गेलेलं मोशन पोस्टर ठरलं होतं. हॉटस्टाने स्वत: याबाबत माहिती दिली होती.अक्षय कुमारसोबतच कियारा अडवाणी, तुषार कपूर शरद केळकर असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. आता ही दिवाळी अक्षयसाठी दणक्यात जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका

या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटात पुढील वर्षाहत अक्षय दिसणार आहे.

वाचा :- ड्रग्स प्रकरणात अक्षयच्या नावाची चर्चा!

वाचा :- …अन नवनीत राणा कडाडल्या!