महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त!
राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.महाराष्ट्रात Coronavius च्या नवीन रुग्णांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात थोडी कमी येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पण Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अद्याप कमी झालेला नाही.
वाचा :- अनलॉक 5 ची नियमावली जाहीर!
गेल्या 24 तासांत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांत वाढ झाली आहे.दिवसभरात 19,163 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर 18,317 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात आतापर्यंत 10,88,322 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप 2,59,033 रुग्ण उपचाराधीन आहेत.
वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका
वाचा :- …अन नवनीत राणा कडाडल्या!