अनलॉक 5 ची नियमावली जाहीर!
शाळा,कॉलेज,धार्मिक स्थळे राहाणार बंदच!
30 Sept :- देशभरात कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु आहे. आणि कोरोना थैमानाची धग देशातील प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात,शहरात,ग्रामीण भागात पसरली आहे.दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वेगाने पसराव होत आहे.याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अनलॉकचे सत्र सुरु करण्यात आलेले आहे.३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजता अनलॉक ४ संपुष्टात येत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनलॉक 5 ची सुरवात करण्यात येत आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 5 चे गाईडलाईन्स जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनलॉक-5 मध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 5 मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार 5 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतांची अट असणार आहे.
वाचा :- कोरोनानंतर भारताला ‘या’ चीनी व्हायरसचा धोका
अनलॉक 4 मध्ये केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली आहे. 21 सप्टेंबरपासून देशभरात अंशिक स्वरुपात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक राज्यांमध्ये शाळा बंदच आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्राच्या परवानगी प्रतीक्षा आहे.
वाचा :- ड्रग्स प्रकरणात अक्षयच्या नावाची चर्चा!
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भारतात एका दिवसात 80472 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 62 लाखांहून अधिक झाली आहे. तर संसर्गापासून बरे झालेल्यांची संख्या 51,87,825 इतकी झाली आहे.
वाचा :- कोरोना लस बनवण्यासाठी होणार 5 लाख शार्क माशांची कत्तल!
वाचा :- …अन नवनीत राणा कडाडल्या!