सिनेमा,मनोरंजन

ड्रग्स प्रकरणात अक्षयच्या नावाची चर्चा!

सोशल मीडियावर बांधला जातोय अंदाज!

30 Sept :- सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत करत आता ड्रुग्स प्रकरणात अनेक बड्या सेलिब्रेटी कलाकारांची,चित्रपट निर्मात्यांची,दिग्दर्शकांची आणि खेळाडूंची नाव समोर येऊ लागली आहेत.मात्र सध्या शरीराच्या तंदुरुस्ती बाबद अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखला जाणारा हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याचे नाव ड्रग्स प्रकरणात असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगू लागली आहे.तर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडालेली दिसत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास करताना D, N, S, K ही नावं समोर येताच तीन बड्या अभिनेत्रींची नार्कोटिक्सच कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू झाली. आता मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीला A, R आणि S अशी नावं सापडली आहेत. A नाव समोर येताच अक्षय कुमारच्या नावाने चर्चा सुरू झाली आहे. एनसीबी आता लवकर A, R आणि S या नावाच्या अभिनेत्यांची चौकशी करणार आहे. या तिन्ही सुपरस्टार्सनी अभिनेत्री दीपिका पादुकोणसह काम केलं आहे, असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं जातं आहे.

वाचा :- हिवाळ्यात वाढणार कोरोनाचा धोका;सरकारने दिला ‘हा’ सल्ला

A नावाचा सेलिब्रिटी स्वत: ड्रग्ज घेतो आणि इतरांनाही देतो, असा दावा केला जातो आहे. त्यामुळे A म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर अक्षय कुमारच आहे असा अंदाज सोशल मीडियावर बांधला जातो आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अक्षय कुमारसाठी त्याचे चाहते लगचेच धावून आले. सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वाचा :- कोरोना लस बनवण्यासाठी होणार 5 लाख शार्क माशांची कत्तल!

अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या तपासानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.

वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता