बीड

सुखद! बीड जिल्ह्यातील आज 144 रुग्ण कोरोनामुक्त!

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

29 Sept :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

शरीरामध्ये सौम्य लक्षण आढळताच त्वरित नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्य आहे. मात्र नागरिक डॉक्टरांच्या परस्पर मनानेच मेडिकलवर जाऊन दैनंदिन गोळ्या-औषंधाची खरेदी करून कोरोना दुखणं अंगावर काढत आहेत.आज बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्यने रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.

वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 9850 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.आजची बीड जिल्ह्यामधील कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. आज बीड जिल्ह्यातून तब्बल 144 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 10.02% आहे.तर रिकव्हरी रेट 71.66 % एवढा आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

वाचा :- राज्यात निवडणुका होण्याची शक्यता

वाचा :- कोरोना लस बनवण्यासाठी होणार 5 लाख शार्क माशांची कत्तल!