बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज ‘146’ नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

बीड जिल्यात रुग्णवाढ कायम!

29 Sept :- बीड जिल्यात कोरोना रुग्णांची संख्या अजुनही वाढतच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नाही. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे कहर थांबण्याचे काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सुरुच आहे.

वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून ‘स्वतः खबरदारी घेणे’ अत्यंत आवश्यक आहे.’माझी कुटुंब माझी जबाबदारी’ या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 146 नवे रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- राज्यात निवडणुका होण्याची शक्यता

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये
बीड -38 ,
अंबाजोगाई – 27,
आष्टी -21,
धारूर – 08,
गेवराई – 06,
केज -19,
माजलगाव-06 ,
परळी वै -07,
पाटोदा- 05,
शिरूर कासार – 06,
वडवणी – 03 आशा पद्धतीने बीड जिल्ह्यात एकूण 146 नवे रुग्ण रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- कोरोना लस बनवण्यासाठी होणार 5 लाख शार्क माशांची कत्तल!