मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन
28 Sept :- राज्यात सध्या कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु असल्या कारणामुळे अनेक व्यावसाय, उद्योग-धंदे, बंद ठेवण्यात आली आहे. बंद पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.बंद असलेली व्यवसाय,उद्योग-धंदे सुरु करण्याच्या दिशेने राज्य सरकार पाऊल उचलत आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
राज्यातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करायला परवानगी देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरंटचालकांना दिलं आहे. कोरोना विषाणूची साथ झाल्यापासून हॉटेल उद्योग बंद आहे. कोविड काळात सर्वाधिक नुकसान झालेलं हे क्षेत्र आहे. त्यामुळे आता अनलॉक महाराष्ट्र च्या पुढच्या टप्प्यात तरी हॉटेल उघडायला परवानगी द्या, अशी मागणी घेऊन हॉटेल व्यावसायिक मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन बैठकीत भेटले. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबरमध्ये रेस्टोरंट आणि बार उघडण्यास परवानगी दिली जाईल, असं सांगितलं आहे.
वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता
पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरांतल्या हॉटेल व्यावसायिकांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक केली. व्यवसायाचं नुकसान थांबवण्याची विनंती केली आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिल्याचं पुणे रेस्टोरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितलं.
वाचा :- कोरोना लस बनवण्यासाठी होणार 5 लाख शार्क माशांची कत्तल!
कोरोना काळात हॉटेल उघडण्यासाठी काय नियम असतील, काय अटी पाळाव्या लागतील याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून लवकरच हॉटेल व्यावसायिकांना दिली जाईल आणि त्या पाळण्याची आमची तयारी असल्याचं शेट्टी म्हणाले. 2020-21 मध्ये जेवढे दिवस हॉटेल व्यवसाय बंद होता ते पाहून प्रो रेटा बेसिसवर उत्पादन शुल्क आकारावी, अशीही विनंती हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. त्याबद्दलही ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचं शेट्टी म्हणाले.
वाचा :- दया भाभीचे होणार पुनरागमन!