राजकारण

राज्यात निवडणुका होण्याची शक्यता

चंद्रकांत पाटीलांनी उडवली खळबळ!

28 Sept :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या झालेल्या गोपनीय भेटीनंतर राज्यकीय वर्तुळात चर्चेचा मोठा भूकंप आला आहे.राज्यतील जनतेमध्ये नवीन सरकार बनते की काय अशा चर्चा सुद्धा रंगल्या आहेत.देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये पडसाद उमटले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.तर काँग्रेसला देखील ही भेट खटकली असल्याचे समोर आले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

‘राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको आहे. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही,’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.’भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,’ अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. मात्र ही भेट राजकीय नसून मुलाखतीबाबत होती, असा खुलासा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.

वाचा :- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी!

‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट राजकीयच होती,’ असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे.’राऊत-फडणवीस भेट जरी राजकीय असली तरीही या भेटीतून फारसं काही निष्पन्न झालं नाही,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र एकीकडे ही भेट केवळ मुलाखतीसाठी असा दावा संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

वाचा :- दया भाभीचे होणार पुनरागमन!

वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’