महाराष्ट्रचे आजचे कोरोना अपडेट!
कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
28 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सध्या दिलासा देणारी आहे.आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे आणि बेशिस्त वागण्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा पसरावं वेगाने होत आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कोरोना विषाणूचा कहर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये,शहरामध्ये,ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे.प्रशासनाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून नागरिक सर्रासपणे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत असल्याचे चित्र दिसत आहे.तोंडावर मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या निष्काळजी लोकांमुळे कोरोना विषाणूचे संकट गडद होताना दिसत आहे.सध्या कोरोना विषाणूंवर कुठलाही औषधी उपचार नसला तरी वेळीच खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे.
वाचा :- तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता
राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर मृत्यूदरातही घट झाली आहे. राज्यात सोमवारी19 हजार 932 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर दिवसभरात 180 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात कमी मृत्यू संख्या आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 77.71 एवढी झाली आहे.दिवसभरात 11 हजार 900 नवे रुग्ण आढळून आलेत. सध्या राज्यात 2 लाख 65 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.
वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!
वाचा :- राज्यात ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता!