Popular News

तज्ञांचा भितीदायक इशारा! कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

लस न आल्यास पर्यायी मार्ग शोधण्याची गरज!

28 Sept :- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वेगाने वाढणारा पसरावं आटोक्यात येत नसल्याने जगभरातील मानवी आयुष्य विस्कळीत आणि उध्वस्त होऊ लागले आहे.जगभरातील देशांची अर्थव्यवस्था कोलमडली असून सर्व सामान्य जनतेला मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.अशा भयाण परीस्ठीमध्ये कोरोना विषाणू तज्ञांनी महामारीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

जगात हे ओळखण्यासाठी अद्याप स्पष्ट नियम नाहीत की, कोणत्या स्थितीत कोरोना प्रकरणांच्या वाढीस एक नवीन लहर म्हणता येईल. त्याच वेळी यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाऊस म्हणाले आहेत की, कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे शक्य आहे. ब्रिटिश कोरोना तज्ञ मार्क वूलहाउस म्हणतात की, लॉकडाउनमुळे कोरोना संपत नाही, तर समस्या थोडी वाढते. ब्रिटनमध्ये कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत आणि पुन्हा देशात राष्ट्रीय लॉकडाउनचा धोका निर्माण झाला आहे.

वाचा :- ‘या’ कारणामुळे रकुलप्रीत सिंहने घेतली हायकोर्टात धाव

वूलहाऊस म्हणतात की, जवळपास होणारी आपत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून या क्षणी संसर्ग कमी होईल, पण यामुळे विषाणू जाणार नाही. एका वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले की, मागील मूल्यांकनात देखील सप्टेंबरमध्ये पुन्हा लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.जेव्हा प्रोफेसर मार्क वूलहाऊस यांना विचारले गेले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल का? तेव्हा ते म्हणाले की, हे पूर्णपणे शक्य आहे.

वाचा :- भाजपनेते गिरीश महाजन यांच्या गाडीचा भीषण अपघात

जर लस पुढील ६ किंवा १२ महिन्यांत येणार नसेल, तर आपल्याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आहे, जसे कि मोठ्या लोकसंख्येसाठी चाचणी करण्याची व्यवस्था.ते म्हणाले की, अलिकडच्या काळात विद्यापीठात कोरोना विषाणूची बरीच प्रकरणे अंदाजानुसारच आहेत. ब्रिटनमध्ये ४ लाख ३४ हजार लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर ४१ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’