राजकारणसिनेमा,मनोरंजन

राऊतांना द्यावं लागणार कोर्टात उत्तर

कंगना-बीएमसी वाद चिघळला!

28 Sept :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद निर्माण झालेला सर्वांनी ऐकला आहे.अभिनेत्री कंगना रनोटने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या वक्तव्याचे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले.मात्र संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यात ‘हरामखोर’ या शब्दाचा उल्लेख केल्याने हे प्रकरण संजय राऊत यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतचे कार्यालय तोडण्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात मोठी चर्चा सुरू आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान वादग्रस्त शब्द ‘हरामखोर’चा उल्लेख करण्यात आला. यावर कोर्टाने सांगितलं की, शिवसेना नेता संजय राऊन यांनी हा शब्द का वापरला याचं उत्तर द्यावं लागेल. कोर्टाची सुनावणी आज दुपारी पुन्हा सुरू झाली आहे.कोर्टात पालिकेच्या वकिलांनी सांगितले की, ही याचिका वेगळ्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. मात्र सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे. हे एक असं प्रकरण आहे की जेथे याचिकाकर्त्याने बेकायदेशीर रुपात अवैध्य बांधकाम करण्यात आलं आहे.

वाचा :- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता;मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्यांनी कंगनाचे 30 ऑगस्टपासून ते आतापर्यंतचे सर्व ट्विट सादर केले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की ते संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखत शोधू शकले नाहीत. केवळ एक क्लिप आहे जी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी कोर्टाने कंगना रणौतच्या वकिलाला बीएमसीच्या कारवाईसंबंधित फाइल आणि संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतीचे क्लिप आणण्यास सांगितले होते.

वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!

यापूर्वी कंगनाच्या कार्यालयात कारवाईबाबत पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की, कंगना म्हणते की हे सर्व त्यांच्या 5 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमुळे झालं आहे , तर ते ट्विट काय होतं, कोर्टाच्या समोर ते सादर केलं जावं ज्यामुळे वेळ लक्षात येईल.कंगनाच्या वकिलांनी यावर म्हटलं की, कंगनाने सरकारच्या विरोधात काही वक्तव्य केलं होते आणि त्यांच्या एका ट्विटवर संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले होते की, कंगनाला धडा शिकवावा लागेल.

वाचा :- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी!

सोबतच कोर्टात कंगनाचे वकिल बिरेंद्र सराफ म्हणाले की, संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ क्लिप ऐकवला, ज्यात त्यांनी हरामखोर शब्दाचा उल्लेख केला होता.यावर संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितलं की, माझे अशीलांनी कोणाचं नाव घेतलं नाही. कोर्टाने राऊत यांचे वकील प्रदीप थोराट यांना विचारलं की, जर संजय राऊत म्हणतात की त्यांनी कंगनासाठी या शब्दाचा वापर केला नाही, तर आपण हा जबाब रेकॉर्ड करू शकतो? यावर उद्या एफिडेव्हिट फाइल करणार असल्याचं राऊत यांच्या वकिलाने सांगितलं

वाचा :- भाजपनेते गिरीश महाजन यांच्या गाडीचा भीषण अपघात

वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’