बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! 171 रुग्ण पॉझिटिव्ह!!

नागरिकांचा निष्काळजीपणा वाढवतोय कोरोनाचे संक्रमण!

28 Sept :- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे साम्राज्य स्थापित होत आहे.बीड जिल्ह्यात दरदिवशी सरासरी पाऊणे दोनशे कोरोना रुग्णाची भर पडत आहे.बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहरात,ग्रामीण भागात,कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नागरिकांच्या निष्काळजीपनणामुळे बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वेगाने पसरावं होत आहे.बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे,तर बीड जिल्ह्यातील नागरीक मास्कचा वापर फक्त औपचारिकरीत्या करताना दिसत आहेत.पंतप्रधान,मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी वारंवार कोरोना पासून काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.मात्र नागरिक या अवहानास डावलून बेशिस्तपनाने वागत असल्याने कोरोनाचे संकट गडद करताना दिसत आहेत.

वाचा :- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता;मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” या योजने प्रमाणे प्रत्येक नागरिकाने काळजी घेतल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास नक्कीच कोरोना विषाणू पासून स्वतःचे आणि स्वतःच्या कुटूंबाचे रक्षण करता येऊ शकते.तोंडावर मास्कचा वापर आणि चार फुटावरील सोशल डिस्टेन्स हाच सध्या कोरोना विरूद्ध दोन हात करण्याचा रामबाण उपाय आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहीनुसार आज बीड जिल्ह्यामध्ये 171 नवे रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!