सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे रकुलप्रीत सिंहने घेतली हायकोर्टात धाव

रकुलप्रीत सिंहने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल!

27 Sept :- हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुलप्रीत सिंह चे बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्याने अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. एनसीबी चौकशी झाल्यानंतर रकुलप्रीतने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माध्यमांमध्ये आपल्याविषयी येणाऱ्या बातम्या, छापून येणारे लेख यावर बंदी आणावी, यासाठी अंतरिम आदेश देण्यात यावे, असी याचिका रकुलप्रीत सिंहने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तिच्या या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रकुलप्रीत सिंहने आपले वकील हिमांशू यादव, अमान हिंगोरानी आणि श्वेता हिंगोरानी यांच्यामार्फत सादर याचिका दाखल केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रकुलप्रीतला समन्स बजावले असून, 24 सप्टेंबरला तिला चौकशीसाठी हजर राहायचे आहे, अशी बातमी 23 सप्टेंबर रोजी मिडीयाने चालवलेली होती. ही बातमी प्रसिध्द झाली तेव्हा रकुलप्रीत सिंह हैदराबादमध्ये चित्रीकरणात व्यस्त होती. आणि ही बातमी पाहून तिला धक्का बसला, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!

रकुलप्रीतला तिच्या हैदराबाद अथवा मुंबईच्या पत्त्यावर कोणतेही समन्स मिळाले नव्हते. यामुळे ती हैदराबादलाच थांबली होती. 24 सप्टेंबर रोजी रकुलप्रीतचे वडील निवृत्त कर्नल कलविंदर सिंह यांनी मिडियाच्या या बातम्यांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी सकाळी विमानाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याआधीच मिडियाने, समन्स मिळाल्याने रकुलप्रीत मुंबईत दाखल, अशी खोटी बातमी पसरविण्यास सुरुवात केली होती.

वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’

मात्र, त्यावेळी ती हैदराबादमध्येच होती, असे या याचिकेत म्हटले आहे.एनसीबी चौकशी दरम्यान, आपण ड्रग्ज बाळगले असल्याचे रकुल प्रीतने कबुल केले आहे. मात्र, ड्रग्ज सेवन करण्याचा आरोप अभिनेत्रीने फेटाळून लावाला. ‘2018मध्ये आपण रिया चक्रवर्तीसह ड्रग्ज चॅट केले होते. मेसेज करून रिया तिचे ड्रग्ज मागत होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज माझ्या घरात होते’, असे रकुल प्रीतने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

वाचा :- लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल अक्रमक;दिला ‘हा’ कडक इशारा

वाचा : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता;मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश