सिनेमा,मनोरंजन

लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल अक्रमक;दिला ‘हा’ कडक इशारा

अनुरागविरोधात कारवाई करा- पाटील घोष

27 Sept :- दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष आता अधिक आक्रमक झाली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात पायलने अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली आहे. रविवारी ती पोलीस स्टेशनमध्ये गेली.जर अनुरागविरोधात कारवाई केली नाही तर उपोषण करेन, असा इशारा तिने दिला आहे.19 सप्टेंबरला पायलने ट्वीट करून अनुरागवर आरोप केले होते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

22 सप्टेंबरला तिनं वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. पायल आणि तिचे वकील नितीन सतपुते रविवारी पोलीस ठाण्यात गेले. तपासात वेग आणावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानं पोलीस स्टेशनबाहेर तिनं प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.पायल म्हणाली, “अनुराग कश्यप प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केल्यानंतरही त्याला अजून अटक केली नाही. जर मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करणार

वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!

“पोलीस ठाण्यात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तपास अधिकारी पोलीस ठाण्यात नव्हते त्यामुळे सोमवारी पुन्हा बोलवलं असल्याचंही तिनं सांगितलं.दोन दिवसांपूर्वीच पायलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या सुरक्षेबाबत देखील शंका उपस्थित केली आहे. 

वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’

इन्स्टाग्रामवर पायलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘मिस्टर अनुराग कश्यप यांच्या विरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला या घटनेसंदर्भात मुलाखत दिली होती आणि मला असे माहित झाले की यासाठी स्वत: अनुराग कश्यपची मला परवानगी घ्यायला हवी होती. इंडिया, मी जर छताला लटकलेली सापडले तर लक्षात ठेवा. मी आत्महत्या केली नसेन. त्यांच्याकडे नैराश्य आणि मेडिकेशनची कहाणी तयार आहे.’ अशी पोस्ट करताना तिने #NotGoingDown #MeToo हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.

वाचा :- कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एँटीबॉडीचा लागला शोध