भाजपनेते गिरीश महाजन यांच्या गाडीचा भीषण अपघात
सुदैवानं गिरीश महाजन सुखरुप!
27 Sept :- उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला रविवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं गिरीश महाजन यांना काहीही झालेलं नाही. ते सुखरुप आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.मिळालेली माहिती अशी की, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा–वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली.
वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा
या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नव्हतं. गिरीश महाजन यांनी स्वत: जखमी तरुणाला मदत केली. महाजन यांनी जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं.जखमी तरुणाची ओळख पटली असून बी.सी. पवार असं त्याचं नाव आहे.
वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!
पवार हा आरोग्य कर्मचारी असून तो वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला आहे.दरम्यान, लोहारा–वरखेडी हा रास्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे आमदार गिरीश महाजन यांचे वाहन हळू चालत होते. मात्र, रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो आमदार महाजन यांच्या वाहनावर मागच्या बाजूनं आदळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
वाचा :- नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’
वाचा :- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी!