राजकारण

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी!

कोरोनाच्या धास्तीनं संपवली जीवनयात्रा!

27 Sept :- राज्यात आणि नागरिकांच्या मानात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून हरीण काळीज असणाऱ्या माणसांमध्ये कोरोना विषाणूची भीती चांगलीच बसलेली असल्याचे दिसून येत आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली कोरोनाबाधित रुग्ण काही दिवसातच कोरोनामुक्त होत आहेत.कोरोनामुक्त होणर्याची संख्या सर्वात जास्त देशात आणि महाराष्ट्रात आहेत.मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून कोरोनाच्या धास्तीने स्वतःची जीवनयात्रा संपवणाऱ्या लोकांची संख्या आता जास्त वाढू लागली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनाच्या धास्तीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं शासकिय घाटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काकासाहेब कणसे असे रुग्णाचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस होते.मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील धनगाव येथील काकासाहेब कणसे यांच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

दरम्यान, 25 सप्टेंबरला त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना आयसीसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, रविवारी सकाळी डॉक्टरांचा राऊंड सुरू असताना त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिलं. त्यानंतर त्यांनी शौचास जाण्याचा बहाण्यानं इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. हा प्रकार वॉर्डातील ब्रदरच्या लक्षात आला. त्यानं खिडकीतून डोकाऊन पाहिले असता कणसे खाली पडलेले दिसले. लगेचच त्यांना अतिविशेषोपचापर इमारतीतील आरएमओ व खालील सुरक्षा रक्षकांना सूचित करण्यात आलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना माहिती देण्यात आली.

वाचा :- कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एँटीबॉडीचा लागला शोध

दरम्यान काकासाहेब कणसे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कोरोनाच्या धास्तीनं त्यांनी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.

वाचा :- ‘या’ कारणामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती;मुख्यमंत्र्यांचा इशारा

वाचा :- फडणवीसांच्या भेटीनंतर पवारांनी बोलावली ठाकरें सोबत तातडीने बैठक!