राजकारण

राऊतांनी फडणवीसांची घेतलेली भेट काँग्रेसला खटकली!

काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेवर साधला निशाणा!

27 Sept :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या झालेल्या गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा भूकंप आला आहे.तर राज्यातील जनतेमध्ये आता नवीन सरकार बनते की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पडसाद उमटल्याचे माहिती समोर आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तातडीने बैठक बोलावली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर संजय राऊतांनी फडणवीसांची घेतलेली भेट काँग्रेसला खटकली आहे.काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

एवढंच नाही तर शिवसेना ही काँग्रेसची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप देखील निरुपम यांनी केला आहे.संजय निरुपम यांनी सांगितलं की, ‘केंद्र सरकारनं मांडलेल्या कृषी विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कडाडून विरोध केला. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. शिवसेनाची भूमिका कायम दिशाभूल करणारी आहे.

वाचा :- कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एँटीबॉडीचा लागला शोध

काँग्रेसने आपला विचारधारा, धर्म, व्यवहार सर्वकाही सोडून सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केले. मात्र, हिच शिवसेना आता काँग्रेसची फसवणूक करते आहे.संजय निरुपम यांनी ट्विटरवरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागली असून ही भूख अनेकांना संपवते. ही दुर्भावना नाही तर वास्तव आहे, अशा शब्दांत निरुपम यांनी घणाघात केला आहे.

वाचा :- ‘या’ कारणामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती;मुख्यमंत्र्यांचा इशारा

वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!