क्रीडा

‘या’ कारणामुळे सारा-शुभमनच्या प्रेमकरण चर्चेला उधाण!

शुभमन होणार सचिनचा जावई?

26 Sept :- सुप्रसिदध असणाऱ्या सेलिब्रेटींच्या तरुण मुलांची चर्चा होण्यास वेळ लागत नाही.छोटयाश्या कारणाने सेलिब्रेटींच्या मुला-मुलींचे नाव एकमेकांशी जोडले जाते आणि अफेअर्सच्या चर्चेला उद्धण येते.असेच काही क्रिकेट जगातला देव म्हणून संबोधला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर बरोबर घडले असल्याची माहिती समोर आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातील ७ सामने आतापर्यंत झाले आहेत. यातील ५ वा सामना बुधवारी (२५ सप्टेंबर) आबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने ४९ धावांनी जिंकला. या सामन्याचा व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. ज्यात युवा फलंदाज शुबमन गिल क्षेत्ररक्षण करताना दिसत होता.

वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!

या पोस्टमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधान आले आहे.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८० धावांमुळे मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स गमावत मोबदल्यात १९५ धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरादाखल दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ १४६ धावाच काढू शकला. मुंबईचा या हंगामातील हा पहिलाच विजय होता.या सामन्यात केकेआरचा सलामीवीर शुबमन गिलला काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. तो अवघ्या ७ धावांवर बाद झाला होता.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

यापूर्वीही शुबमन गिलने इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्याने त्याच्या फोटोला जे शीर्षक दिले होते सारानेही तेच शीर्षक तिच्या शेअर केलेल्या फोटोला दिले होते. त्यावेळीसुद्धा दोघांच्या अफेअरची अफवा समोर आली होती.शुबमनने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते.

वाचा :- बॉलीवूड हादरले; शाहरुख आणि करन जोहर संशयाच्या घेऱ्यात!

वाचा :- ‘या’ कारणामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती;मुख्यमंत्र्यांचा इशारा