कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एँटीबॉडीचा लागला शोध
कोरोनाला थोपवण्यास होणार मदत!
26 Sept :- जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनावरील लस शोधण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातील बऱ्याच देशांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. यादरम्यानच संशोधकांनी कोरोना व्हायरससोबत लढणाऱया एका एँटीबॉडीचा शोध लावला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
संशोधकांना असंही आढळलं आहे की, ही एँटीबॉडी कोरोना व्हायरसला शरीरातील पेशींत जायला आणि प्रजनन करण्यास मज्जाव करते.सेल या नियतकालिकाच्या मते, कोरोना व्हायरसवर सुरु असलेल्या संशोधनात जर्मनीतील बर्लिनमध्ये सेंटर फॉर न्यूरॉडीजेनेरिटिव्ह एँड चॅरिटी यूनिवर्सिटामेडिजिनच्या शास्त्रज्ञांना मोठं यश आलं आहे.या संशोधनात शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या 600 रुग्णांच्या शरीरातील वेगवेगळ्या एँटीबॉडी घेऊन संशोधन केलं आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी या एँटीबॉडीपासून एक कृत्रिम एँटीबॉडी तयार केली आहे.
वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!
संशोधनानंतर तयार केलेल्या ‘न्यूट्रलाइजिंग’ या कृत्रीम एँटीबॉडीचा परिणाम कोरोना व्हायरसवर दिसून आला आहे.शास्त्रज्ञांनी सांगितलं की, न्यूट्रलाइजिंग च्या साहाय्याने आम्ही बऱ्याच प्रमाणात कोरोनाचा नायनाट करण्यात यश मिळवलं आहे. पण अजून काही दिवस यावर संशोधन चालणार आहे. या संशोधनात दिसून आलं आहे की न्यूट्रलाइजिंग ही एँटीबॉडी कोरोना व्हायरसला आपल्या शरीरात प्रजनन करण्यापासून रोखत आहे.आता अमेरिकेतील फार्मा कंपनी नोवॅक्सनं ब्रिटनमध्ये कोविड19 च्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या करत असून त्या लशींचं निरिक्षण सुरु केलं आहे.
वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा
कोणतीही लस बाजारात येण्यापुर्वी सुरक्षेसाठी तिच्या चाचण्या करुन निकाल पाहावा लागतो. कंपनीच्या मते, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा सध्याचा वेग मोठा आहे. यामुळे इथं केलेल्या चाचणींचा रिझल्ट लवकर मिळू शकतो. कंपनीने सांगितलं आहे की, या चाचण्यामध्ये 18 ते 84 वयातील 10 हजार लोकांवर लसीची चाचणी करून त्यांचं निरिक्षण केलं जात आहे. विशेष म्हणजे यातील 25 टक्के लोक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
वाचा :- सावधान! ‘या’ अँप्लिकेशनमुळे होऊ शकते तुमचे बँक खाते रिकामे
वाचा : बॉलीवूड हादरले; शाहरुख आणि करन जोहर संशयाच्या घेऱ्यात!