महाराष्ट्र

राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान विभागाने वार्वला अंदाज!

26 Sept :- काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कमी झाल्या नंतर आता पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही भागात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तुरळक ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

उत्तर भारतातून लवकरच परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. त्यातच मध्य महाराष्ट्र ते कोमोरीन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने तुरळक ठिकाणी काही प्रमाणात दुपारनंतर ढग जमा होत आहे. यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडत आहे.

वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!

दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान ढगाळ तर अधूनमधून ऊन पडत होते.मराठवाडा व विदर्भातही उन्हाचा चटका वाढला होता. शुक्रवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यत नागपूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेलिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. पुण्यातही सरासरीच्या तुलनेत उणे एक अंश सेल्सिअसने कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उकाड्यात सकाळपासून वाढ होत आहे.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात तुरळक सरी पडतील. रविवारपासून (ता.२७) राज्यातील काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडणार असून तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

वाचा :- बॉलीवूड हादरले; शाहरुख आणि करन जोहर संशयाच्या घेऱ्यात!