राजकारण

राऊत,फडणवीसांच्या भेटीने राज्यात भूकंप!

नव्या चर्चेला उधाण!

26 Sept :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली.या भेटीने राज्यामध्ये अनेक प्रकारच्या चर्चेचा भूकंप आला.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले जात आहेत.पुन्हा नवीन सरकार स्थापन होते कि काय असे अनेक प्रश्न नागरिकांच्या चर्चेमध्ये सुद्धा रंगू लागले आहेत.आणि अखेर या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली.

वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत संजय राऊत यांची भेट झाली आहे. जय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.अशी माहिती समोर आली आहे.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

वाचा :- सावधान! ‘या’ अँप्लिकेशनमुळे होऊ शकते तुमचे बँक खाते रिकामे