सिनेमा,मनोरंजन

बॉलीवूड हादरले; शाहरुख आणि करन जोहर संशयाच्या घेऱ्यात!

लवकरच चौकशी होण्याची शक्यता!

26 Sept :- हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध मोठ्या मोठ्या सेलिब्रेटींच्या नाव समोर येऊन लागल्याने सामान्य माणसांना एका पाठोपाठ धक्के लागत आहेत तर आवघी हिंदी चित्रपट सृष्टीसुद्धा हादरून निघतात आहे.दीपिका,श्रद्धा,सारा,राकुल प्रीत सिंग,दिया मिर्जा आशा अनेक आभिनेत्र्यांना NCB ने समन्स पाठवून चौषी केली आहे.तर शाहरुख खान आणि करण जोहर संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास आता करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनपर्यंत पोहोचला आहे. धर्मा प्रोडक्शनचे एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसर क्षितीज प्रसाद आणि धर्मा प्रोडक्शनचे असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, क्षितीजच्या चौकशीमुळे शाहरुख खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!

नेमकं शाहरुख खान का एनसीबीच्या तपासाच्या घेऱ्यात येऊ शकतो यामागचे कारण असे की,करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये क्षितीज प्रसाद हे फक्त एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसरच नाही तर एक मोठं नाव आहे. क्षितिज प्रसाद यांनी धर्मा प्रोडक्शनच्या आधी बालाजी टेलिफिल्मस, शाहरूख खानची रेड चिलीज आणि जॉन अब्राहम प्रोडक्शन हाऊससाठीही काम करत होता. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

वाचा :- सावधान! ‘या’ अँप्लिकेशनमुळे होऊ शकते तुमचे बँक खाते रिकामे

क्षितीज प्रकाशला जेव्हा एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या घरातून गांजाही सापडला होता.क्षितीज प्रकाश धर्मा प्रोडक्शनचं मोठं नाव आहे आणि इतर मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा त्याने काम केल आहे. ज्यामुळे एक मोठा मासा एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं जातं आहे. मुलाखतीत शर्लिन चोप्राने काही गंभीर आरोप ही लावले होते.

वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा

शर्लिनचा दावा आहे की ‘आयपीएलची टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेत होत्या तर बॉलिवूडचा किंग खान सुद्धा ड्रग्सचं सेवन करतात’ हा खळबळजनक दावा शर्लिन चोप्राने केला. क्षितिज प्रसाद हा आधी शाहरुख खानच्या मालकीच्या असलेल्या रेड चिलीजमध्ये सुद्धा होता. त्यामुळे क्षितीजकडून फक्त धर्मा प्रोडक्शनचं नाही तर रेड चिलीज बद्दल सुद्धा माहिती एनसीबीकडून घेण्यात येणार आहे.

वाचा :- ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार!

क्षितीज प्रकाशसोबत धर्मा प्रोडक्शनचा असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडाची सुद्धा चौकशी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आली. तसच करण जोहरच्या घरी ड्रग्स पार्टी झाली असा आरोप करत अनेक लोकांकडून करण जोहर आणि त्या पार्टीला उपस्थित सेलिब्रिटीजची चौकशी अशी मागणी होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात करण जोहरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न एनसीबी करणार हे निश्चित.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!