3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!
श्रद्धा,साराचीही झाली कसून चौकशी!
26 Sept :- ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे. एनसीबीकडून समन्स आल्यानंतर आज दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. तीन तास दीपिकाची चौकशी करण्यात आली. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे. गेल्या तीन तासांहून अधिक काळा दीपिकाची चौकशी केल्यानंतर दीपिकाने ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली .दरम्यान, जवळपास 12 वाजेच्या सुमारास श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. तिची देखील चौकशी करण्यात आली. तर सारा अली खान देखील एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. या दोघींचीही भरपूर वेळ चौकशी करण्यात आली आहे.
वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या
एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले होते. आज दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी झालीआहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.