क्रीडा

आणि गावस्करांवर अनुष्का भडकली!

गावस्करांनीही टोचले अनुष्काचे कान!

25 Sept :- रोमांचक असणारा आयपीलाचा तेरावा हंगाम सुरु झाला आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना देखील पूर्ण झाला आहे.मात्र आयपीलच्या या रोमांचक तेराव्या हंगामामध्ये नवीन वादाला तोंड फुटले असल्याचे दिसून येत आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोहलीवर खरमरीत टीका केली होती. पण आता गावस्कर यांच्यावर अनुष्का शर्मा चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

अनुष्काने गावस्कर यांना चांगलेच सुनावले होते. अनुष्का म्हणाली होती की, ” खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”विराटकडून जेव्हा हे झेल सुटले तेव्हा गावस्कर हे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांनी विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काबरोबरच सराव केला, असे म्हटले. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

वाचा :- ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार!

अनुष्काच्या या प्रतिक्रियेनंतर गावस्करांनी सुद्धा अनुष्काचे कान टोचले आहेत. गावस्कर म्हणाले की, ” मी आणि आकाश चोप्रा समालोचन करत होतो. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना जास्त सराव करायला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांना लय सापडत नाही, असे आकाश म्हणत होता. त्यावेळी मी त्याला बोललो की, विराटलाही लॉकडाऊनमध्ये जास्त सराव करण्याची संधी मिळाली नाही. लॉकडाऊनमध्ये अनुष्काबरोबर विराट आपल्या इमारतीमध्ये क्रिकेट खेळत असल्याचे मी पाहिले. त्यामुळे विराट अनुष्काबरोबर लॉकडाऊनमध्ये सराव करत होता, असे मी म्हटले. त्यामध्ये काही चुकीचे आहे, असे माला तरी वाटत नाही.”

वाचा :- तर राणू मंडल असती अमिताभ बरोबर

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या