महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन!

एसटी कर्मचारी झाले आक्रमक!

25 Sept :- गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांची थकलेली पगार होत नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. एसटी महामंडळातील पालघर, ठाणे आणि मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यांपासून थकलेले पगार आणि परळ डेपोतील 8 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केल्याप्रकरणी परळ डेपोमध्ये एसटी महामंडळातील चालक वाहकांनी काही काळ काम बंद आंदोलन केलं.यावेळी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. परंतु सध्या मुंबईत कलम 144 लागू असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलन करू नये अन्यथा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी थांबवली आणि वरिष्ठांसोबत चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

ही मागणी मान्य झाल्यामुळे आंदोलक शांत झाले.यावेळी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. परंतु सध्या मुंबईत कलम 144 लागू असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलन करू नये अन्यथा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी थांबवली आणि वरिष्ठांसोबत चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

ही मागणी मान्य झाल्यामुळे आंदोलक शांत झाले.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मुंबई विभागीय सचिव राजन येल्वे म्हणाले की, मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. यामध्ये पालघर, मुंबई, ठाणे विभागातील कामगार टाळेबंदीत कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव असताना देखील कामावर आले होते. अशा कर्मचाऱ्यांचे पगार एसटी महामंडळाने अद्याप केलेले नाहीत.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!

यासोबतच काही कर्मचारी टाळेबंदीच्या काळात कामावर नव्हते. त्यांना 48 तासांची नोटीस बजावण्यात आली होती. तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी काही कर्मचारी मिळेल त्या वाहनाने मुंबईत पोहचले. कामावर हजर देखील झाले परंतु तरीदेखील आशा कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. यातील काही कर्मचारी असे आहेत की ते परळ डेपोमध्ये येऊन थांबले होते.

वाचा :- ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार!

सध्या कर्मचारी जास्त झाल्यामुळे त्यांना परळ डेपोच्या व्यवस्थापकांनी हजर करून घेतलं नाही त्याला देखील सेवा समाप्तीचं पत्र हातात देण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, एकीकडे हजर होण्यासाठी नोटिसा बजावता आणि दुसरीकडे हजर होऊन देखील कामावरून काढून टाकण्याचा दुटप्पीपणा का? जर या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कर्मचारी पुन्हा आंदोलन करतील आणि याला प्रशासन जबाबदार असेल.

वाचा :- तर राणू मंडल असती अमिताभ बरोबर

वाचा :- …हे पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय- सिद्धार्थ