महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे ‘कोरोना’ अपडेट!

कोरोनमुक्त होणाऱ्यांचे वाढते प्रमाण दिलासादायक!

25 Sept :- राज्यात सर्वत्रच कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा वाढत पसरावं मोठ्या संकटाचे संकेत देऊ लागला आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक असली तरी राज्यात कोरोनमुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या दिलासा देणारी आहे. वेळीच योग्य ती खबरदारी घेतलयास कोरोना विषाणूच्या घेऱ्यातून मुक्तता होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण शुक्रवारी पुन्हा वाढलं आहे.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

शुक्रवारी 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नसून शुक्रवारी 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र गुरुवारी नवे रुग्ण जास्त आढळून आले होते. शुक्रवारी पुन्हा डिस्चार्ज होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!

वाचा :- तर राणू मंडल असती अमिताभ बरोबर