क्रीडा

‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार!

गौतम गंभीरनं केले भाकित!

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

25 Sept :- आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे. सर्व संघाचे एक-एक सामनेही झाले आहे. काही रेकॉर्डही खेळाडूंनी आपल्या नावावर केले आहेत, मात्र आयपीएलच्या या हंगामात पहिलं शतक झळकावण्याची कामगिरी केली ती किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलनं बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलनं 132 धावांची तुफानी खेळी केली. यासह भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं राहुलची खेळी पाहता तो भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकते असे भाकित केले आहे.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

गंभीरच्या मते, येत्या काळात केएल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.गंभीरने केवळ राहुलचं नाही तर पंजाब संघाचे कोच अनिल कुंबळे यांचेही कौतुक केले. कुंबळे सर्वात चांगले कोच असल्याचे गंभीर म्हणाला. बंगळुरू संघाविरुद्ध काल झालेल्या सामन्यात राहुलनं 69 चेंडूत 132 धावांची खेळी केली. यासह आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिली शतकी खेळी करणारा राहुल खेळाडू ठरला आहे.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!

बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यानंतर क्रिकइन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला की, “बऱ्याच वेळा कर्णधार असताना उतार चढाव येतात. मात्र माझ्या मते राहुल उत्तम कर्णधार आहे. विराटचे वय आता 30 आहे, रोहितनेही तिशी ओलांढली आहे. त्यामुळे येत्या काळात युवा खेळाडूंकडे कर्णधारपद द्यावे. यासाठी राहुल योग्य पर्याय आहे. मात्र त्यासाठी राहुलला तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. राहुलचे कसोटीमध्ये सातत्य नाही आहे”

वाचा :- जाणून घ्या! इम्युनिटी कमजोर असण्याची कारणे