सिनेमा,मनोरंजन

धक्कादायक बातमी! नवाजुद्दीन विरोधात बलात्कार प्रकरणी तक्रार दाखल

बलात्कार आणि फसवणूकीचा आरोप!

24 Sept :- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, पण आता या प्रकरणात अभिनेत्याच्या अडचणी वाढत असल्याचे माहिती समोर येत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा आरोप केला आहे. ही तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नवाजुद्दीन विरोधात लेखी तक्रार दिल्यानंतर आलियाच्या वकिलांनीही सांगितले की, “माझ्या क्लायंटने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक, बलात्काराची सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे.” नवाजुद्दीन सिद्दीकीवर कलम 420 आणि 493 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवाजुद्दीनकडूनही न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये सुरू असलेला वाद समोर आला होता.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

एका आठवड्यापूर्वी आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसह कुटुंबातील चार सदस्यांविरूद्ध तक्रार दाखल कली होती. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदवण्यात आला होता. एका वृत्तवाहिनी वरील मुलाखती दरम्यान आलिया म्हणाली, 2003 पासून मी नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते.

वाचा :- गुढ उकलले; ‘या’ कारणाने झाला सुशांतचा मृत्यु!

आम्ही एकत्र राहू लागलो. त्याचा भाऊ शामही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. मग आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काहीना काही खटके उडायचे. मला वाटले की वेळेनुसार हे थांबेल मात्र असे झाले नाही, 15 ते 16 वर्षे झाली आणि अत्याचार थांबले नाही या उलट ते आणखी वाढतचे गेले.’

वाचा :- धक्कदायक खुलासा! ‘KKR’ च्या पार्टीत केलं जातं ‘ड्रग्स’ चं सेवन

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या