क्रीडा

धक्कदायक खुलासा! ‘KKR’ च्या पार्टीत केलं जातं ‘ड्रग्स’ चं सेवन

शर्लिनने केला खुलासा!

24 Sept :- सुशांत आत्महत्या प्रकरणाचा शोध घेत घेत आता ड्रग्स प्रकरण उलगडू लागले आहेत.हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक अभिनेते,अभिनेत्री,टीव्ही वरील कलावंत ड्रग्स सेवन करत असल्याचे उघड होत असतानाच आता नवीन धक्कादायक आणि खळबळजनक माहितीचा खुलासा झाला आहे.IPL मधील लोकप्रिय असलेला अभिनेता शाहरुख खानचा संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं जातं.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या पार्ट्यांमध्ये स्टार्स व क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्सचं सेवन करतात, किंग खान कसा आहे हे सर्वांना माहित आहे,” असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री शर्लिन शोप्राने केला आहे. ड्रग्सचं सेवन करणाऱ्यांची नावं मी अमली पदार्थविरोधी पथकाकडे एनसीबी सोपवेन असंही ती म्हणाली. वृत्त वाहिनीवरील ‘मुलाखतीत शर्लिनने हा खुलासा केला.या मुलाखतीत शर्लिनने शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि क्वान कंपनीच्या मालकावरही गंभीर आरोप केले.

वाचा :- वेळीच लक्ष द्या! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णात जाणवतात ‘या’ समस्या

“मी केकेआरचा सामना पाहण्यासाठी कोलकाताला गेले होते. सामना झाल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.दीपिकाला ‘माल’ न मिळाल्याने ती नैराश्यात गेली. क्वान कंपनीचा मालक हा अत्यंत वाईट माणूस आहे. त्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली”, असे आरोप शर्लिनने या मुलाखतीत केले.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!