बिल गेट्स यांचे भाकीत खरे ठरणार का..?
कोरोना संपल्यानंतर कसे असेल जग.. ?
24 Sept :- जगभरात सध्या कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु आहे.कोरोना विषाणूच्या पसरावामुळे जगामध्ये मानवी आयुष्यात अनेक नवं नवीन अनेक नवीन बदल घडून आले आहेत. सध्या करोना कालावधीमुळे सगळीकडे वर्क फ्रॉम होम हे कल्चर खऱ्या अर्थाने रुजले आहे. कोविड १९ च्या साथीमुळे सेवा क्षेत्रातील आणि माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्यांनी हे नवे वर्क कल्चर आत्मसात केले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
करोना संपला तरीही अशाच पद्धतीने काम चालू राहील असे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना वाटत आहे.त्यांनी याचे फायदे सांगतानाच काही तोटे काय आहेत हेही सांगितले आहेत.बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होम अशावेळी अडचणीचे ठरते जेंव्हा आपल्या घरी लहान मुले खूप त्रास देत असतात. किंवा अनेकदा घर छोटे असते तेंव्हाही नाही चांगले काम करणे शक्य होत. महिलांना तर अशावेळी घरातील काम जास्त पडत असल्याने त्यांच्या कामावर बराच परिणाम होतो.
वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!
मात्र, तरीही त्यांनी म्हटले आहे की, घरातून काम करण्याची सवय आता अनेकांना लागली आहे. एकूण स्टाफमधील २०, ३० किंवा ५० टक्के कर्मचारी कार्यालयातून आणि उरलेले घरातून काम करण्याची ही कार्यपद्धती भविष्यात राहण्याची शक्यता आहे. एकूणच जग या बदलासाठी सज्ज आहे असे बिल गेट्स यांना वाटत आहे.