सिनेमा,मनोरंजन

गुढ उकलले; ‘या’ कारणाने झाला सुशांतचा मृत्यु!

सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आला समोर!

24 Sept :- काही महिन्यांपूर्वीच सुशांतनं मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. पण, ही हत्या असल्याचे अनेकांनी म्हटले. त्यानंतर माध्यमांनीही हे प्रकरण जास्तीच लावून धरले. माध्यमांनीही सुशांत प्रकरणात अनेक शक्यता वर्तविल्या. त्यानंतर आता काही अंशी सुशांतच्या मृत्यूचं गुढ उकलल्याचं स्पष्ट होत आहे. सीएफएसएल म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेचा प्रसंग तपासाच्या अनुशंगानं पुनरुज्जीवित करण्यात आला. पण, यातही सुशांतनं आत्महत्या केल्याचंच उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये त्यानं गळफास लावल्याचं निष्पन्न होत आहे.सीएफएसएसने हा अहवाल सीबीआयकडे पाठवला आहे. सुशांतच्या मृत्यूचं कारण पार्शिअल सुसाईड असल्याचाच दावा या अहवालातून करण्यात आला आहे.या अहवालामध्ये मृत व्यक्तीचे पाय फाशीच्या वेळी पूर्णपणे हवेत नव्हते. त्याचे पाय बेड अथवा जमिनीला टेकले होते. क्राईम सीन रिक्रिएशन आणि आत्महत्येसाठी वापरण्यात आलेल्या कापडाची पडताळणी केल्यानंतरच हा अहवाल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!

हातांचा सरळ वापर करणारी व्यक्तीच असं करु शकते असा निष्कर्ष काढत खुद्द सुशांतचनंच फास लावून घेतल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. थोडक्यात या अहवालाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्यामुळं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासावरही लवकरच पडदा पडण्याची चिन्हं आहेत.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!