खळबळजनक! IPL मध्येही घेतले जाते ‘ड्रग्ज’
बॉलीवूड,टीव्ही कलाकारां नंतर क्रिकेटर सुद्धा ‘ड्रग्ज’ घेत असल्याचा दावा!
24 Sept :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता याप्रकरणी आरोप असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि मग हळूहळू बॉलिवूडमधीलच ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली, ज्यांचा ड्रग्जची संबंध आहे. त्यानंतर टीव्ही कलाकारांचीही नावं उघड झाली आणि आता या सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीही सुरू आहे. त्याता आता आयपीएलमध्येही ड्रग्जचा वापर होत असल्याचा खळबळजनक दावा एका अभिनेत्रीने केला आहे.
वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने आयपीएलमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे दावा केला आहे. कोरोनाकाता नाइट रायडर्स च्या मॅचनंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी वॉशरूममध्ये कोकिन घ्यायच्या. मला एनसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं, तर मी ही सविस्तर खुलासा करणार असल्याचंही शर्लिन म्हणाली.
वाचा :- जाणून घ्या! इम्युनिटी कमजोर असण्याची कारणे
शर्लिनने आयपीएलच्या कोणत्या सिझनमध्ये हे तिनं पाहिलं हे सांगितलेलं नाही. आयपीएलचे सामने तिसऱ्यांदा भारताबाहेर खेळवले जात आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत आयपीएल झाली होती आणि आता दुसऱ्यांदा यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आलं आहे.
वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!