चेन्नईला पुन्हा धक्का; ‘या’ कारणामुळे रायडू संघाबाहेर
चेन्नई संघांच्या अडचणींमध्ये पडली भर!
24 Sept :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये अनेक अडचणींची तडजोड करत २०२० मधील IPL च्या रोमांचक थराराची सुरवात झाली आहे.क्रिकेट प्रेमींना अनेक रंगतदार सामने सुद्धा पाह्यला मिळाली आहेत.२०२० मधील चेन्नई संघाची IPL मध्ये धमाकेदार सुरवात झाली.कर्णधार महेंद्रसिंग धावोणीचे कुशल नेतृत्व आणि आंबवती रायुडूच्या उत्कृष्ठ खेळीने चेन्नई संघाला सलमीच्याच सामन्यात बलाढ्य असणाऱ्या मुंबईच्या संघा विरोधात विजयाची चव चाखता आली.राजस्थान संघा विरोधात पराजयाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई सगळा आणखी एक नवीन धक्का बसला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा भरवशाचा फलंदाज अंबाती रायडू खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे रायडू या आणखी एका सामन्यातून बाहेर पडला आहे. CSK च्या व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.अगोदरच चेन्नईच्या संघाला या IPL हंगामाच्या सुरुवातीपासून एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. सुरुवातीलाच चेन्नईच्या संघाला कोरोना विषाणूचा फटका बसला.
वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!
एका खेळाडूला संसर्ग झाला. त्यानंतर दोन खेळाडू IPL खेळणार नसल्याचं जाहीर झालं. तरीही पहिला सामना CSK ने रायडूच्या शानदार खेळीने जिंकला होता. आता पुढच्या सामन्यात अंबाती रायडूच नसल्यामुळे चेन्नईला धक्का बसला आहे.IPL 2020 च्या चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात अंबाती रायडूने 3 षटकार आणि 6 चौकार मारून 48 चेंडूत 71 धावांची बरसात केली होती. त्याच्या या दमदार खेळीने चेन्नईचा विजय सुकर झाला होता.मात्र आता दुखापतग्रस्त असल्या कारणाने रायडू खेळणार नसल्याने निश्चितच चेन्नई संघांच्या अडचणींमध्ये भर पडली हे नक्की.