राजकारण

एकनाथ शिंदें कोरोनाच्या विळख्यात!

एकनाथ शिंदेंनी स्वतः ट्वीट करून दिली माहिती’

24 Sept :- देशभरात सर्वत्र कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु आहे.देशामध्ये सर्वत्र राज्यात,जिल्ह्यात,शहरात,ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सर्व सामान्यांसह अनेक मोठ-मोठी सेलिब्रेटी कलाकार,अभिनेते,खेळाडू,राजकीय मंत्री,नेते मंडळी,प्रशासकीय अधिकारी कोरोना विषाणूच्या चपेटीत अडकली आहेत.तर कोरोना विषाणूच्या घेऱ्यात आलेल्या अनेक नागरिकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू होत आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेनेचे महत्त्वाचे शिलेदार एकनाथ शिंदें यांना करोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.’काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…’ असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा :- वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!

कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेले काही दिवस एकनाथ शिंदे सातत्याने कोविड 19 केअर हाँस्पिटलमध्ये पीपीई कीट घालून पहाणी करत होते. त्यामुळे त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाल्याची शक्यात व्यक्तं केली जात आहे.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!