राजकारण

केंद्रीयमंत्री सुरेश अंगडी यांच कोरोनामुळे निधन

पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री पडले कोरोनाला बळी!

23 Sept :- देशभरात सर्वत्र कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु आहे.देशामध्ये सर्वत्र राज्यात,जिल्ह्यात,शहरात,ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सर्व सामान्यांसह अनेक मोठ-मोठी सेलिब्रेटी कलाकार,अभिनेते,खेळाडू,राजकीय मंत्री,नेते मंडळी,प्रशासकीय अधिकारी कोरोना विषाणूच्या चपेटीत अडकली आहेत.तर कोरोना विषाणूच्या घेऱ्यात आलेल्या अनेक नागरिकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू होत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

अनेक सुरक्षित स्थळी सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला झाला आहे.आता आलेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.

वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय

अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

वाचा :- मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!