महाराष्ट्र

मुसळधार पावसाचं पाणी शिरलं नाट्यगृहात

रस्ता-नाले एक जीव होऊन वाहू लागले!

23 Sept :- एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचे वाढत असलेले महाकाय थैमान आणि दुसरीकडे पावसाने अवघ्या महाराष्ट्राला धोऊन काढले आहे.राज्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता कहर केला असल्याचे चित्र दिसू लागले आहे.मुसळधार पावसाने मुंबईला झोड़पून काढलं आहे.मुंबईमध्ये पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणी रस्ता- नाले एक जीव होऊन वाहू लागले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे शहराची दैना झाली असून परळच्या नाट्यगृहातच पाणी शिरलं आहे.हे नाट्यगृह असलेल्या सर्वच भागात प्रचंड पाणी साचलं आहे.नाट्यगृहात खुर्च्या सुद्धा पावसाच्या पाण्याखाली आहेत.एवढी भयाण अवस्था परळच्या नाट्यगृहाची झाली आहे.त्यामुळे सगळीच ड्रेनेज व्यवस्था कोलमडून पडली आहे.

वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय

ड्रेनेजच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडल्याने पाणी ओव्हर फ्लो झालं आणि रस्त्यांचं रुपांतर नाल्यामध्ये झालं.अनेक तास पाणी या नाट्यगृहात साचलेलं होतं. त्यातच बुधवारी संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सगळ्यांचीच काळजी वाढली होती.

वाचा :- मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!