महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

21 हजार रुग्ण आढळले!

23 Sept :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे.राज्यात आज सरासरी दर तासाला एक हजार रुग्ण आढळत आहेत.राज्यात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त होती. त्यात आता खंड पडला आहे. आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 75.65वर गेला आहे. तर मृत्यू दर 2.68 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 18 लाखांपेक्षा जास्त जण होम क्वारंटाइन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येनं पहिल्यांदा 2 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तरी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे. मात्र, गडचिरोली शहरात वाढलेल्या रुग्ण संख्या पाहाता प्रशासनानं ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. बुधवारपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!