सिनेमा,मनोरंजन

दीपिका,श्रद्धा,साराला NCB ने पाठवले समन्स!

तीन दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार!

22 Sept :- बॉलिवूड आणि ड्रग्जचे नाते नवीन नाही. 70 च्या दशकात बॉलिवूडमधील काही कलाकार अमली पदार्थांचे सेवन करत असतं. मात्र त्यावेळी याचे प्रमाण फार कमी होते. मात्र 80च्या दशकात बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याकाळात कोकेनला सर्वाधिक मागणी असल्याचे बोलले जाते. बॉलिवूडमध्ये तेव्हापासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम असून अनेक जण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवू़ड आणि ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याची हत्या झाली की आत्महत्या याचा छडा लावता लावता हे प्रकरण ड्रग्जपर्यंत येऊन पोहोचले सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत.अभिनेत्री कंगना रनोटच्या मते 90% लोक ड्रग्ज घेतात, तर रियाने इंड्रस्ट्रीतील 80% लोक ड्रग्ज घेत असल्याचे म्हटले आहे.

वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय

एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावले आहे. या अभिनेत्रींना पुढील तीन दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागेल.तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली.

वाचा :-  मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!

यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते की, गरज भासल्यास दीपिकाला चौकशीसाठी बोलवलं जावू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित अमली पदार्थांविषयी व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एजन्सीच्या तपासांतर्गत आहेत.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!