मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!
‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार!
23 Sept :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि याच कारणामुळे मराठा समाजाने अनेक ठिकाणी वेगवेगळी आंदोलने सुद्धा केली आहेत.मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाने आता आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला असल्याचे दिसून येत आहे.कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.या आंदोलनाची विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज बुधवारी राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.
वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय
विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही.
वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!
आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.