Popular News

जाणून घ्या! इम्युनिटी कमजोर असण्याची कारणे

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

22 Sept :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्याने आपण इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करु लागलो आहोत. पण, इम्युनिटी पॉवर कमी होण्याची नेमकी लक्षणं काय असतात याकडे आपण गांभिर्याने पाहणे गरजेचे असते. इम्युनिटी आपल्या शरीरातील टॉक्सिन्सशी लढण्यात मदत करते. चांगली इम्युनिटी, केवळ सर्दी, खोकल्यापासूनच वाचवत नाही, तर हेपेटायटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते.

वाचा :- सावधान! राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) कमजोर असण्याची कारणे
आधीपासूनच असलेला एखादा आजार,धुम्रपान करणे,मद्यपान करणे,
झोप पूर्ण न होणे,खाण्या-पिण्याची अयोग्य सवय,
इम्युनिटी कमी असण्याची लक्षणे-सतत थकवा जाणवणं, झोप पूर्ण न होणं ही रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यची लक्षणं आहेत.

वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!

सतत संसर्ग होणं,सतत आजारी पडणं, सतत सर्दी-खोकलाचा त्रास होणं, ताप येणं, घसा खराब होणं किंवा शरीरावर पुरळ-रॅशेस येणं अशा समस्या असल्यास, इम्युनिटी कमजोर असल्याची शक्यता असू शकते.
जखम झाल्यास ती लवकर बरी होत नसेल, तर रोगप्रतिकारशक्ती कमी असणं हे यामागील कारण असू शकते.

वाचा :- राज्य सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश

व्हिटॅमिन डी इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं. अनेकांमध्ये याची मोठी कमतरता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास सतत थकवा जाणवतो हे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचे लक्षण आहे.आतड्यांमध्ये असणारे बॅक्टेरिया थेट इम्युन सिस्टमवर परिणाम करतात. जर सतत अतिसार, अल्सर, गॅस होणं, सूज येणं किंवा बद्धकोष्ठता असल्यास, हे इम्युन सिस्टम योग्यरित्या काम करत नसल्याचे संकेत ठरु शकतात.

वाचा :- दीपिकाचे ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आले समोर!